🕒 1 min read
मुंबई: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“देशाचे नेते खासदार शरद पवार हुशार आहेत हे मान्य केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे मनापासून आभार. मात्र पवार साहेब हे कुठल्या स्पेअर पार्ट ने बनले आहेत हे आपल्याला या जन्मात कधीही कळू शकणार नाही, कारण तुमची नजर फक्त द्वेषाचीच आहे.”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
परंतु आपले राजकारण फक्त पवार साहेबांचा द्वेष करण्यावरच टिकलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला पवार साहेब या जन्मातच काय तर अनेक जन्म घेतले तरीही कळणार नाहीत.
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) May 25, 2022
महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला विचारल्यास तोही हे सांगू शकेल की पवार साहेब प्रेम, सेवा, त्याग, दूरदृष्टी, कर्तृत्व याच स्पेअर पार्टनी बनलेले आहेत. परंतु आपले राजकारण फक्त पवार साहेबांचा द्वेष करण्यावरच टिकलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला पवार साहेब या जन्मातच काय तर अनेक जन्म घेतले तरीही कळणार नाहीत. अगदी ब्रम्हदेवाला जरी तुम्ही विचारलत तरी ते सुद्धा प्रेम, सेवा, त्याग, दूरदृष्टी, कर्तृत्व यांनी पवार साहेब बनले आहेत, असे आपल्याला सांगतील. असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “जागृत हिंदू समाज पवारांच्या तुटून पडण्याला कवडीचीही किंमत देत नाही”, अतुल भातखळकरांचा टोला
- “उद्या काय होईल याची काळजी…”, टेक्सासमधील ‘त्या’ घटनेनंतर बराक ओबामा यांनी व्यक्त केली चिंता
- “…तरी दोघांचे प्राण वाचले असते”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणे यांचा संताप
- “छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून…”, निलेश राणेंचा टोला
- देवेंद्र फडणवीसांच्या ‘जलआक्रोश’ मोर्चावर सचिन सावंत यांची टीका; गुजरातचा हवाला देत म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
