मुंबई: देशात सध्या ज्ञानवापी मशीद-मंदिर वाद चांगलाच गाजत आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीद जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. पण महागाई, बरेजगारीवरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“ज्ञानवापी वादावर शरद पवार यांनी रोखठोक मत मांडून ते मोदी सरकारवर तुटून पडले म्हणे. ज्ञानवापी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावरून मोदी सरकारवर टीका करणे हे अपरिपक्व बुद्धीचे लक्षण आहे. जागृत हिंदू समाज पवारांच्या तुटून पडण्याला कवडीचीही किंमत देत नाही ही त्यांची खरी शोकांतिका आहे.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान दिल्लीतील कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला ठाऊक आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही जन कुतुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सर्व गोष्टी यासाठी सांगतोय कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी विचारांना चालना दिली जात आहे. असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्या काय होईल याची काळजी…”, टेक्सासमधील ‘त्या’ घटनेनंतर बराक ओबामा यांनी व्यक्त केली चिंता
- “…तरी दोघांचे प्राण वाचले असते”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणे यांचा संताप
- “छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून…”, निलेश राणेंचा टोला
- देवेंद्र फडणवीसांच्या ‘जलआक्रोश’ मोर्चावर सचिन सावंत यांची टीका; गुजरातचा हवाला देत म्हणाले…
- “…या पायंड्याला पंतप्रधान मोदींनी विरोध करायला हवा”, संजय राऊतांची मागणी


