Share

…तेव्हा राज्यात पुन्हा निर्बंध लागू करावेच लागतील; टास्क फोर्स प्रमुखांचे विधान

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार आणि प्रशासन घेत असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक ची घोषणा करतानाच ऑक्सिजनची ठराविक मर्यादेपेक्षा अधिक गरज भासू लागल्यानंतर पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असं विधान केलं होतं.

आता राज्यातील सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी भाष्य केलं आहे. ‘राज्यात एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल,’ अशी माहिती संजय ओक यांनी दिली आहे.

‘ टास्क फोर्सने अनेक बैठका घेऊन शासनाला निर्बंध कसे शिथिल करता येतील यबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुकाने, मॉल्स, जिम खुली करण्यात आली आहेत मात्र हे निर्बंध शिथिल करत असताना शासनाने समाजाकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. मास्क सोशल डिस्टंसिंग, जिथे-जिथे वर फ्रॉम शक्य आहे या प्रणालीचा वापर करणं, कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवणे, क्यू आर कोड आयडी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव आहे,’ असं देखील डॉ संजय ओक यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!