Share

…तर अंतिम सामन्यात रोहित शर्माचं दुहेरी शतक समजा ; पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. अशातच ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्याआधी दिग्गज भविष्यवाणी करताना दिसत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू आणि स्टार क्रिकेट समालोचक रमीज राजाने देखील यावेळी मोठी भविष्यवाणी केली आहे.

‘रोहित शर्मा मॅचविनिंग खेळाडू आहे. त्याच्याकडे मोठा डाव खेळण्याची क्षमता आणि प्रतिभा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जर त्याची बॅट चालली तर तो दुहेरी शकत ठोकेन, असं राजा म्हणाले. अंतिम सामन्यात भारतीय डावाची सुरुवात आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील, अशी अपेक्षा आहे. असे देखील ते पुढे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!