🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही विश्वास नाही. त्यामुळे ते त्यांच्याकडेही मुख्यमंत्रि पदाचा चार्ज देत नाहीयेत. पार्टीतही कुणावर विश्वास नसेल तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करुन घ्या, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही.
परीक्षा घोटाळ्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत ते दिसलं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्कॅम आहे. तो बहुदा मंत्रालयापर्यंत येऊन भिडतो आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवातपण झालीय. अशावेळी महाराष्ट्र पोलीस कशी काय चौकशी करणार. त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार तरी आहे की नाही. की तोंडं दाबून ठेवणार आहात. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
