लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे एक ऱ्हदयद्रावक घटना घडली आहे. एकाच दिवशी जन्मलेल्या जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मेरठ येथील ग्रेगरी रेमंड राफेल यांनी कोरोनामुळे आपल्या जुळ्या मुलांना गमावले आहे. दोघांचा एकत्रच जन्म झाला आणि मृत्यूही एकत्रच आला. २४ व्या वाढदिवसाला जुळ्या भावांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला.
जोफ्रेड आणि राल्फ्रेड अशी दोघांची नावे होती. ते दोघेही इंजिनिअर होते. दोघांनी २३ एप्रिलला आपला २४ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच दिवशी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यानंतर १३ आणि १४ मे रोजी या दोन्ही भावांचा मृत्यू झाला. दोघांनी एकत्र या जगाचा निरोप घेतला.
जोफ्रेड आणि राल्फ्रेड या दोघांनी आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकत्र केल्या. दोघांचा जन्म एकत्र झाला. इजिनिअरिंगचं शिक्षणही एकत्र गेतलं. तसेच हैदराबाद येथील एका कंपनीमध्ये एकत्र जॉबही करत होते.
दोन-दोन तरुण मुलांना गमवल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंब काही क्षणात उद्धवस्त झालं. दोन्ही मुलांच्या जन्मामध्ये फक्त 3 मिनिटांचं अंतर होतं. वडिल रेमंड राफेल यांनी सांगितलं की, दोन्ही मुलं खूपच हुशार होती. दोघांनी कम्प्यूटर इंजिनिअरींग केलं होतं. आधी दोघांनीही घरीच उपचार घेतले. पण नंतर त्यांचा ऑक्सीजन लेवल ९० च्या खाली आला. त्यांनतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. पंरतू उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक बेपत्ता? ईडी, सीबीआयची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

