नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना ते वाईट होते, त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हापासून ते भाजपाचे झाले. त्याप्रमाणे तुम्ही मला सतत देशद्रोही म्हणाल, तर मी भाजपात प्रवेश करीन, ज्यांना हे शिव्या देतात, त्यांना पाच मिनिटांनंतर काका म्हणायला सुरुवात करतात, असं वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केलं.
कन्हैय्या कुमार यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्या भाषणात ते हे वाक्य बोलताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राजकारण तापलं आहे. कन्हैय्या कुमार यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं असून ते भाकपसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले आहेत.
दरम्यान बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.
महत्वाच्या बातम्या :-
- संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
- ‘साधूसंतांना अटक करून उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले’
- ‘चंद्रकांतदादा परत बाप काढू नका, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार देखील नाही’
- ‘कर्नाटक’मध्ये कंगना विरोधात गुन्हा दाखल
- मोठी बातमी : तुम्हाला अटक का करू नये ? अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

