Share

‘चंद्रकांतदादा परत बाप काढू नका, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार देखील नाही’

Published On: 

🕒 1 min read

सातारा : काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली होती. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस गोळा करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यांच्या बापाची पेंड आहे का?; अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारलं होतं.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात.

सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे?  असा घणाघात शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

तर,  शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपा ची ? अशी जोरदार टीका देखील शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे. असा जोरदार टोला शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!