मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं वादंग पाहायला मिळालं. त्यावरून राजकीय वातावरणही तापलं होतं. बिहार-महाराष्ट्र, बिहार पोलीस व महाराष्ट्र पोलीस असा शाब्दिक संघर्षही बघायला मिळाला. त्यातूनच अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस, मुंबईविषयी वादग्रस्त विधान केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं होतं.
कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते याचदरम्यान कंगना अजून एका अडचणीत सापडली होती. कंगणा वरती कर्नाटकातील एका कोर्टाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी, कंगना विरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.
तुमकूरूच्या प्रथम-वर्ग न्यायिक दंडाधिकारी जेएमएफसी न्यायालयाने वकील रमेश नाईक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे क्याथासंदरा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला कंगना रनौतविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. कोर्टाने म्हटलं की, तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम 166 (3) अन्वये तक्रार दाखल केली आहे.
याचदरम्यान पुन्हा एकदा अभिनेत्री कंगणाने महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना गुंड सरकार असं म्हटल आहे. मागील काही काळापासून महाराष्ट्र सरकारविरोधात भूमिका घेणारी अभिनेत्री कंगनाने ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- कारशेड हलवणं हा ‘बालहट्ट’ असेल, तर ‘Axis बँके’त सरकारी खाती वळवण्याचा कोणता हट्ट म्हणायचा?
- आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीने दिला स्वबळाचा नारा!
- मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा राज्यपालांना अधिकार : प्रकाश आंबेडकर
- संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
- ‘साधूसंतांना अटक करून उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले’


