Share

मोठी बातमी : तुम्हाला अटक का करू नये ? अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसांनी चाप्टर प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला आहे.

पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना यापुढे प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. तसंच, 10 लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

वरळी न्यायालयाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड (कलम 11 )अन्वये ही नोटीस बजावली आहे. अर्णब यांना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!