इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे.
यामध्ये मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजला कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोने केले होते. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा हे प्रमुख गोलंदाज संघात असतानाही सिराजला खेळवण्याचा भारतीय संघ विचार करत आहे. पण अजूनही भारताने आपल्या अंतिम-11 खेळाडूंबाबत निर्णय घेतलेला नाही.
अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करण्यासाठी सिराज सज्ज आहे. ‘मी अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. मला माझ्या संघाला सामना जिंकवून द्यायला आवडेल, असे सिराज मुलाखतीदरम्यान म्हणाला. मी अशीच कामगिरी करत राहिलो, तर खूप पुढे जाईन, असे विराटने मला सांगितले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळण्यासाठी मी आतुर आहे, असेही सिराजने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या

