मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गाझीपूरला जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देणार आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाझीपूर दौऱ्यावर आशिष शेलार यांनी टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, आपल्या बारामतीमध्ये, बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धत आपण का अवलंबताय?, या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्याांना भेटायला जा, अशा शब्दात शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण?; रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

