🕒 1 min read
कोल्हापूर : काल(१४ फेब्रु.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना करुणा शर्मा(Karuna Sharma) यांनी शिवशक्ती पक्ष कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असेही करुणा यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुढे बोलत असतांना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना करुणा शर्मा म्हणाल्या की,‘शक्ती कायदा हा फक्त दिखावा असून जर त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) किंवा महाराष्ट्र सरकारने जर काही केले असते तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं. त्यानंतर संजय राठोड यांना तुरुंगात टाकलं असतं. पण या लोकांवर साधा एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही’, असे शर्मा म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘जिथे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करु’, असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- “अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला…” ; शिवसेनेची खोचक टीका
- भाजपचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना-सचिन सावंत
- “शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम…” संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
- “मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”, भातखळकरांचा टोला
- ”हे” असणार एअर इंडियाचे नवीन सीइओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
