मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माफी मागितली. काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी दिली होती. पण सोमवारी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मलिकांनी समीर वानखेडे ‘चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे’ अशी टीका केली होती. यावरून न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे मलिकांनी उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
या पार्श्वभूमीवर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. लेखी हमी देऊनही अनावधानानं वानखेडेंबद्दल वक्तव्य केल्याबद्दल मलिकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणतेही वक्तव्य करणार नाही अशी हमीही त्यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) नवाब मलिकांचा माफीनामा देखील स्विकारला आहे.
म्हणून जास्त हवेत उडायचं नसतं, ड्रग माफियाला वाचवायला हाच मलिक कारणीभूत आहे, त्या बदल्यात एका अधिकाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचं कारस्थान घडवून मलिक यानी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली. एका ड्रग ॲडिक्टसाठी मलिक इतका पिसाळला होता की सांगून सोय नाही. pic.twitter.com/4v9tIZIpyk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 11, 2021
आता या प्रकरणी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले, म्हणून जास्त हवेत उडायचं नसतं, ड्रग माफियाला वाचवायला हाच मलिक कारणीभूत आहे, त्या बदल्यात एका अधिकाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचं कारस्थान घडवून मलिक यानी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली. एका ड्रग ॲडिक्टसाठी मलिक इतका पिसाळला होता की सांगून सोय नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ते’ कळायला इतके वर्षे लागले तर खरा चू**; निलेश राणेंची जहरी टिका
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
- आता बस्स..! नागा चैतन्यला घटस्फोट देण्यावर समांथाची प्रतिक्रिया
- नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
- दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ तीन वरिष्ठ खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा!


