औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील महालगांव येथील बजाज शोरुमचे शटर तोडून चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची घटना घडली शोरुमचे मागील शटर तोडून दोन नविन दुचाकी पल्सर १२५ व १५० सीसी चोरून नेल्या.
या दुचाकींची किंमत आडीच लाख रुपये इतकी आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळु नये यासाठी हार्डीक्सही चोरटे घेऊन गेले. तसेच शोरूममध्ये कपाटातील सामानही अस्त व्यस्त केले. हि माहिती शोरूम उघडण्यासाठी आलेल्या कर्मचार्याच्या लक्षात येताच त्याने पोलिसांना संपर्क केला.
या घटनेची माहिती मिळताच विरगांव पोलीस ठाण्याचे फौजदार नवनाथ कदम व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन याबाबत पंचनामा केला. या घटनेची नोंद विरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!
- पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात ; शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय
- राज्यात पावसाने घेतले आतापर्यंत १२९ जणांचे बळी ; आकडा वाढण्याची भीती


