पुणे : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचा १४वा हंगाम सुरु होत आहे. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी युएईमध्ये आयपीएल स्पर्धा भरवीण्यात आली होती. यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची गणना आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्याकडे बॉल आणि बॅटने सामना पलटवण्याची ताकद आहे.
शुक्रवारी त्याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक तुफानी डाव खेळत इंग्लंड संघाला जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो ज्या प्रकारच्या फॉर्मात आहे ते पाहून बोलर्स घाबरु शकतात, अशी परिस्थिती आहे. केवळ 52 चेंडूत त्याने 10 षटकार ठोकत 99 धावा काढल्या. त्याची हीच फलंदाजी येत्या आयपीएलमध्येही पाहायला मिळू शकते, असं म्हणत इंग्लंडचा उपकर्णधार जॉस बटलरने गोलंदाजांना इशारा दिलाय.
बेन स्टोक्स त्याचा हाच फॉर्म आगामी आयपीएलच्या 14 व्या हंगामात देखील कायम ठेवेल, असा विश्वास बटलरने व्यक्त केला आहे. बटलर आणि स्टोक्स हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतात.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- परभणी जिल्ह्यात सात दिवसात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू
- ‘क्रुणाल पांड्या भारतीय संघाचा पाचवा बोलर होऊ शकत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

