🕒 1 min read
बीड: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णात वाढ होत चालली आहे. कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. बाधित रुग्ण ठेवायचे कोठे? हा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात विस्तारित पावणे दोनशे खाटांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. अवघ्या वीसपर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या तीन आठवड्यांतच पावणेचारशेच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात सध्या ३३०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.त्यापैकी २४६० खाटा मंजूर असून त्यानुसार उपाचारासाठी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या विविध कोविड सेंटरमध्ये १५९४ रुग्णांवर उपचार सुरु असून ५९३ जण गृहअलगीकरणात आहेत. ॲक्टीव्ह रुग्णसंख्या दोन हजार ५१२ इतकी असून गृहअलगीकरण नसते तर सगळे बेड फुल्ल झाले असते, अशी स्थिती आहे.
जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णांसाठी ४०० खाटा उपलब्ध आहेत. हे कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले असून रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी पावणेदोनशे विस्तारीत खाटांसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयाअंतर्गत मुलींचे नर्सिंग हॉस्टेल आणि डोळ्याच्या रूग्णांचा वार्ड तसेच नवजात शिशु कक्ष, जुने सिझर वॉर्ड येथे कोरोना रुग्णांसाठी खाटा तयार करुन ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा उभारता येईल का, याची चाचपणी सुरु आहे.या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हधिकाऱ्यांना सादर केलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- परभणी जिल्ह्यात सात दिवसात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू
- शहर अभियंत्याला माहिती आयुक्त यांनी ठोकला पाच हजारांचा दंड

