🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आगामी मालिकेसंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंडच्या दौऱ्यावरुन परत आला आहे. या दौऱ्यावरुन मायदेशी परतण्यापुर्वी इंग्लंडच्या संघातील काही खेळाडूंना कोरोनााची लागण झाली होती. यानंतर मायदेशी परतल्यानंतर श्रीलंका संघाच्या सदस्याची आणि सपोर्ट स्टाफला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक शिरांथा निरोशन यांचा अहवाल सकारात्मक आला. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला.
भारताविरुद्धची मालिका १३ जुलै ऐवजी १७ जुलैला सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने आता १७, १९ आणि २१ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे. तर टी-२० मालिका २१ जुलैच्या ऐवजी २४ जुलैपासुन सुरु होणार आहे. या मालिकेतील सामने २४, २५ आणि २७ जुलै दरम्यान होणार आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप भारताविरुद्धच्या संघाच्या कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पुणे होणार आता ४ च्या काट्याला पूर्णतः बंद ; अजितदादांनी दिले सक्त आदेश
- ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही ‘त्यांचे’ पत्ते – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
