Share

पुणे होणार आता ४ च्या काट्याला पूर्णतः बंद ; अजितदादांनी दिले सक्त आदेश

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.

कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

दरम्यान आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नियम काटेकोर पणे पाळण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहे.

सध्या पुणे शहरातील दुकाने दुपारी ४ ला बंद होतात. पण हातगाडीवाले, पथारीवाले ४ नंतर देखील सर्रास सुरु असतात आणि ते उशिरापर्यंत हे सुरु राहतात. तिथे नागरिकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र, ही बाब काही लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांना आणि प्रशासनाला शहर दुपारी ४ नंतर पूर्णतः बंद झाले पाहिजे असा आदेश दिला आहे.

जे नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्या चे सांगतानाच त्यांनी राज्य सरकारकडून शनिवार आणि रविवारबाबत जे काही निर्णय झाले आहे ते तसेच लागू असतील असेही स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!