Share

ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही ‘त्यांचे’ पत्ते – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीसह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अचानक खूप जास्त सक्रीय झाल्या असून महाविकास आघाडीतील अनेक नेते सध्या अडचणीत येत चालले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या अडचणीत देखील वाढ होत आहे. ईडीने काल खडसेंची तब्बल ९ तास कसून चौकशी केली.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ईडी, सीबीआयच्या चौकशांवरून भाजपवर हल्लाबोल केला. ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचा पत्ता आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यंत्रणा वापरून दहशत वापरणाऱ्यांचं नामोनिशाण संपल्याच अनेकदा पाहिलेलं आहे. तसंच होईल, असं भाकीत देखील संजय राऊत यांनी वर्तवलं आहे.

‘ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही चौकशीसाठी देऊ. इथं पण अनेक घोटाळे आहेत. पण इथं ईडी किंवा सीबीआय का जात नाही. की फक्त यांच्याकडे खडसे, देशमुख, सरनाईक यांचेच पत्ते आहेत. भाजपवाल्यांचे पत्ते नाहीत का? आम्ही पण ह्यांचे पत्ते देऊ,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्याचा नंबर लागणार का ? हे येत्या काळातच समजेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!