🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची चाहूल आता शहरात लागली आहे. २०२२ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक होणे अपेक्षित असून आता राजकीय क्षेत्रातील हालचाल वाढली आहे. २०१४ नंतरच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला. २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली.
यामुळे एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. त्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली तरी राज्यातील सरकारमध्ये झालेला बदल आणि एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट, इनकमिंग झालेल्या नगरसेवकांची घरवापसी यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळे भाजपसाठी आव्हान अधिक वाढलं आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपला सत्ता राखण्यास जड जाऊ शकते.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे आमचे ध्येय असल्याचं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एकीकडे अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कंबर कसली असतानाच संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात किमान ५० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले असता पत्रकारांनी ५० मध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर होत नाही, असं म्हटलं. त्यावर ५५ आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची की नाही ते योग्य वेळी ठरवू, असं देखील म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ ; पटोलेंचा टोला
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी एमपीएससीच्या जागा तात्काळ भरा, विद्यार्थी संघटना आक्रमक!
- ‘इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला, केंद्रातही आणि राज्यातही’ ; फडणवीसांचा टोला
- ‘मला, भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवले’, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
