जालना: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जालन्यात कडक लॉकडाऊन असताना तीन दरोडेखोर दुचाकीने गिऱ्हाईक बनून शहरातील संभाजीनगर भागातील मनीषनगर परिसरात आले. दुकान बंद असताना सामान घ्यायचे म्हणून दुकान उघडायला लावून तिघांनी दुकानाचे मालक साबरमल झाला यांना पिस्तुलाने डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि २० ते २२ हजार रूपयांची रोकड असा एकूण २५ हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी चाकू व पिस्तुल घटनास्थळावर सोडून धूम ठोकली.
शहरातील मनीषनगर भागात साबरमल झाला (वय ५२) यांचे पारस हार्डवेअर हे दुकान सध्या लॉकडाऊन असल्याने बंद होते. त्यामुळे व्यापारी झाला हे बाहेर बसलेले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तिघा दरोडेखोरांनी काही सामान खरेदी करावयाचे असल्याचे सांगून त्यांना विनंती करून दुकान उघडावयास लावले. दुकानात गेल्यानंतर तिघांनी झाला हे सामान काढत असताना त्यांच्या गळ्याला चाकू लावत पिस्तुलचा धाक दाखवित त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील चेन काढून घेतली. त्यानंतर गल्ल्यातील २० ते २२ हजारांची रोकड आणि अंगठी, चेन मिळून एकूण २५ हजारांचा ऐवज लुटला. जाता जाता त्यांनी झाला यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.
परंतू त्यांनी फुटेज देण्यास नकार देताच त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. झाला यांनी वार चुकविल्याने त्यांच्या हातावर चाकू लागला. त्यानंतर पिस्तुलाने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले.याप्रकरणी साबरमल झाला यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश झलवार हे करीत आहे. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दुचाकीवरुन तिघे जाताना दिसत आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचाही राजीनामा देईल’
- कोल्हापूरात येत्या २ दिवसात कडक लॉकडाऊन लावणार : हसन मुश्रीफ
- ‘द शो मस्ट हो ऑन’ वडिलांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतरही ‘या’ अभिनेत्याने पुर्ण केला सीन
- नानांनी कचराच करून टाकला; बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये – राणे
- कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या त्रासाला पालिका जबादार; बजावली नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
