Share

खा. शरद पवारांचे कट्टर विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

Published On: 

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात.

गेली अनेक वर्ष ते राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. बारामती मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

१९७८ व १९८२ मध्ये ते खासदार होते. १९७१मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार झाले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळचळीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!