Share

ममता बॅनर्जींना चॅलेंज देणारे सुवेंदू अधिकारी यांना भाजपने दिली ‘ही’ खास भेट

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेय. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. भाजपचा ममता बॅनर्जींनी पार धुव्वा उडवला.

परंतु सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक लढाईत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुवेंदूअधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना 1956 मतांनी पराभूत केले. निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांना एकूण 109673 मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना 107937 मते मिळाली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. सुवेंदू यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षासाठी चांगली ठरली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची मोठी जबाबदारी दिली आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, सुवेंदू यांना संधी देत पक्षाने मोठी जबाबदारी दिली. भारतीय जनता पक्षाने सुवेंदू अधिकारी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!