Share

जेनेलियाने दिले शोधून रितेशला त्याचे पहिले प्रेम

Published On: 

मुंबई : बॉलीवुडमधील सर्वात क्युट कपल रितेश-जेनेलिया हे दोघेही सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय आसतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोवर लाईक आणि कमेंटचा नुसता पाऊस पडतो. रितेश आणि जेनेलियाच्या प्रेमाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी यांची नवीन चर्चा सुरु झाली आहे. रितेश देशमुखचे पहिले प्रेम जेनेलिया नसल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे.

रितेशने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले की, त्याचे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर फोटोग्राफी आहे. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. मात्र सिनेमात पदार्पण केल्यानंतर रितेश आपल्या पहिल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा त्याचे प्रेम मिळवून दिले. जेनेलियाने त्याला एका कॅमेरा भेट दिला आणि आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा इंडस्ट्रीमधील सर्वात ‘क्यूट कपल’ आहे यात शंका नाही. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. मात्र नंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि हे दोघे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांना आता दोन छान मुले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!