🕒 1 min read
नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.
यामध्ये ओलाने जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन केंद्राची घोषणा केली आहे. या ओला फ्युचर फॅक्टरीच्या उत्पादन केंद्रामधून वार्षिक १ कोटी वाहनांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे तामिळनाडूमधील उत्पादन केंद्र २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.ओलाच्या उत्पादन केंद्रामुळे थेट १० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. यामुळे लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करतअसलेल्या एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्लाला हा प्रकल्प टक्कर देणार आहे.
त्याचबरोबर ओलाचे पुरवठादार आणि विक्रेते यांना नोकऱ्या मिळणार आहेत. ओला फॅक्टरची सीईओ तथा चेअरमन भाविष अग्रवाल यांनी उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा जून अखेर सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर ‘जैसे थे’असा असेल उत्पादन प्रकल्प-पहिल्या टप्प्यात वार्षिक २० लाख वाहनांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. हा उत्पादन प्रकल्प तामिळनाडूमधील कृषीनगरी जिल्ह्यातील ५०० एकरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
या कारखान्यात १० उत्पादन लाईन्स पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कारखान्यामध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेवर असणारे ३ हजार रोबोट असणार आहेत. हे रोबोट उद्योगाच्या ४. तत्वावर तयार करण्यात आलेली आहेत. उत्पादनामध्ये बॅटरी ते सर्व वस्तुंचे उत्पादन घेण्यात येणार आहे.हेही वाचा-कोरोनाशी लढा: टीव्हीएस कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देणार मोफत लसओलाने इलेक्ट्रिक स्कूटरची झलकही प्रदर्शित केली आहे. नुकतेच टेस्लाने इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालयाची नोंदणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे एवढं दुबळं सरकार आहे की राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत’
- विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

