🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यापासून वेगाने फैलावत आहे. सामान्य नागरीकांसह अनेक कलाकार आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवराना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या या विळख्याने आरोग्य व्यवस्था आणीबाणीच्या परिस्थीतीतून जात आहे. औषधे आणि बेड्सची कमतरता असलेली माहिती रोज समोर येत आहे. याचा फटका भारतीय क्रिकेट मधील भारत अ संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याला बसला आहे.
देशाला एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदचे कुटुंबीय देखील कोरोनाबाधित झाले आहे. मात्र काही औषधांची गरज पूर्ण होत नसल्याने उन्मुक्तने औषधांच्या मागण्यासाठी ट्विट करून मदत मागितली. उन्मुक्तने ट्विटमध्ये लिहिले, ‘माझी आई व काका यांना तातडीने रेमेडीसीवर औषधांची गरज आहे. त्या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. काही माहिती असल्यास तात्काळ कळवा.’ अशी विनंती केली आहे.
Immediately require Remdesevir vials for my mother and uncle who are suffering from Covid 19. Kindly send leads ASAP pic.twitter.com/VqepVzfcPH
— Unmukt Chand (@UnmuktChand9) April 17, 2021
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनचे छायाचित्रयासह उन्मुक चंदने हे ट्विट केले आहे. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक चाहत्यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषक विजेत्या संघाचे त्याने नेतृत्व केले होते. तसेच त्याने आयपीएलमध्ये दिल्ली डेरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघांचा भाग राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने मॅच फिरवली
- हिटमॅन शर्मा धोनीला मागे टाकत बनला ‘सिक्सर किंग
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- ऑरेंज आर्मीची पराभवाची हॅटट्रिक; मुंबई विरुद्ध १३ धावांनी स्विकारावा लागला पराभव
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
