मुंबई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित-डिकॉक यांनी सावध सुरुवात करत संघाला अर्धशतकी सलाामी दिली. मात्र रोहित बाद होताच ठरावीक अंतराने गडी बाद झाल्याने धावसंख्येला लगाम बसला. मात्र नंतर फलंदाजीला आलेल्या किरॉन पोलार्डने फटकेबाजी करत संघाला १५० धावांची मजल मारुन दिली. मुंबईकडुन सलामीवीर डिकॉकने सर्वाधीक ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहितने ३२, तर पोलार्डने ३५ धावा केल्या.
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात जोरदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोन्ही सलामीवीरानी ५ षटकाच्या आतच अर्धशतकी धावांची सलामी दिली. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या तिसऱ्या षटकात जॉनीने १८ धावा वसुल केल्या. आठव्या षटकांत बेअरस्टो ४३ धावांवर बाद झाल्यानंतरही कर्णधार वॉर्नरचा तडाखा सुरुच होता. मात्र बाराव्या षटकात हार्दिकने वॉर्नरला धावबाद केले आणि सामना मुंबईच्या बाजुने झुकला. एक धाव घेण्याच्या नादात त्याला तंबूत जायला लागलं.
HARDIK PANDYA saving the game with fielding. Legendary????????????????????????????????#MIvSRH pic.twitter.com/LIAuhzz1M7
— CC is the ???? (@rantworld101) April 17, 2021
हार्दिक पांड्याच्या ‘रॉकेट थ्रो’ने त्याचं काम तमाम झालं. वॉर्नर एक धाव घ्यायला गेला पण ही धाव त्याला महागात पडली. त्याने 36 धावांचे योगदान दिलं. तो जर शेवटपर्यंत पीचवर राहिला असता तर हैदराबादला सहज विजय मिळाला असता. साहजिक वॉर्नर आऊट झाल्याने हैदराबादचा पराभव तिथेच नक्की झाला.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- ऑरेंज आर्मीची पराभवाची हॅटट्रिक; मुंबई विरुद्ध १३ धावांनी स्विकारावा लागला पराभव
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
- लातूर महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपयांची मदत
- हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

