Share

सफारी पार्कचे काम धीम्या गतीने; निवीदाच्या तांत्रिक मुल्यांकनाचे काम संथगतीने

Published On: 

औरंगाबाद : मिटमिटा येथील शंभर एकर जमिनीवर सफारी पार्क उभारले जाणार आहे. या संपूर्ण परिसराला एखाद्या किल्ल्यासारखा लूक दिला जाणार आहे. नियोजनानुसार लवकरच पहिल्या टप्प्यातील कामालाही प्रारंभ होणार आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून सफारी पार्कसाठी दाखल झालेल्या निविदांचे तांत्रिक मुल्यांकनाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अद्याप कंत्राटदार कंपनी अंतिम झालेली नाही.

निविदांच्या तांत्रिक मुल्यांकनास आणखी आठवडाभराचा अवधी लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून पडेगाव परिसरातील मिटमिटा येथील गट क्रमांक-३०७ मधील माळरानावर सफारी पार्क प्रकल्प राबवला जाणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने या कामासाठी १४७ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. पहिल्या टप्यातील कामांसाठी १५ कोटीची निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार १७ एजन्सींनी या कामासाठी निविदा दाखल केल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून या निविदांच्या तांत्रिक मुल्यांकनाचे काम सुरू आहे.

मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने अद्यापही निविदा अंतिम झालेल्या नाहीत. याबाबत स्मार्ट सिटी कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या अजून निविदांच्या तांत्रिक मुल्यांकनाचे काम सुरु आहे. ते पूर्ण होण्यास अजून आठवडाभराचा अवधी लागणार आहे. तांत्रिक मुल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच निविदा अंतिम करून निगोसेशन केले जाईल. वाढीव दर आल्यास कमी करण्यासाठी संबंधित एजन्सीशी चर्चा केली जाईल. नंतर प्रस्ताव मंजुरीसाठी स्मार्ट सिटी बोर्डाकडे सादर केला जाईल.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!