Share

बुरखा परिधान न केलेल्या महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून ओढून गोळ्या घातल्या

Published On: 

🕒 1 min read

 नवी दिल्ली- अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने एकदा आपली ताकत वाढवायला सुरुवात केली आहे.अमेरिका आणि इतर देशांनी सैन्यमाघारी सुरू केल्यानं तालिबाननं देशभरात अनेक मुख्य शहरं आणि जिल्हे ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.  तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून महिलांवर जाचक कायदे लागू केले आहेत.

यातच आता नुकतीच बुरखा परिधान न केलेल्या एक महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून ओढून गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. नाजनीन नावाची २१ वर्षीय महिला बल्ख जिल्हा केंद्राकडे जात होती, दरम्यान तिला तालिबानी दहशतवाद्यांनी तिला कारमधून ओढलं आणि तिची गोळ्या घालून हत्या केली. बल्ख हे उत्तरेतील अशांत क्षेत्र आहे, जिथे तालिबान अनेक भागांमध्ये सक्रीय आहे. तर, तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद या घटनेचे खंडण केले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी काल राजधानी काबूलमधील सरकारी माध्यम केंद्रात घुसून तिथल्या संचालकाची देखील हत्या केली. देशाच्या संरक्षण मंत्र्यांची हत्या करण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.

अफगाणिस्तानातल्या अनेक जिल्ह्यांवर वर्चस्व मिळवलेल्या तालिबाननं काल निमरोझ प्रांताची राजधानी झारंज या शहराचाही ताबा मिळवला आहे. इराणच्या सीमेवरचं हे मोठं व्यापारी केंद्र आहे. या शहराचं संरक्षण करण्यासाठी सरकारकडून कुमक न मिळाल्यानं झारंज दहशतवाद्यांच्या ताब्यात गेल्याचा दावा इथल्या पोलिसांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!