Share

धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ ७० धावांनी आघाडीवर होता. भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर अटोपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने एकही गडी न गमावता २५ धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची मधली फळी अपयशी ठरल्यानंतर भारतीय संघाचा डाव लवकर अटोपण्याची शक्यता निर्माण झाली होती. १४५ धावांवर भारतीय संघाने ५ गडी गमावल्यानंतर रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी आला आणि त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने ८६ चेंडुत ८ चौकार आणि १ षटकारासंह ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने २२ धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा आणि २०० गडी बाद करणारा तो पाचवा खेळाडू बनला.

जडेजाने ही कामगीरी ५३ कसोटी सामन्यात केली आहे. या यादीत इंग्लंडचा महान अष्टपैलु खेळाडू इयन बॉथम हे आहेत. त्यांनी ४३ कसोटी सामन्यात ही कामगीरी केली आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भारताचे माजी कर्णधार कपील देव आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटु आणि आताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ५० कसोटी सामन्यात ही किमया साधली होती. तर भारताचा आघडीचा फिरकीपटू आर अश्विनने ही कामगीरी ५१ सामन्यात केली होती. आता जडेजा या यादीत पाचव्या स्थानी आहे. तसेच कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि आर.अश्विन या भारतीय क्रिकेटपटुनंतर अशी कामगीरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!