🕒 1 min read
मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जर्मनीला पराभुत करत तब्बल ४१ वर्षानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रात केंद्र सरकारच्या नावाने दिला जाणारा पुरस्काराबद्दल त्यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रात देण्यात येणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलुन पंतप्रधान मोदी यांनी आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे.
यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या या निर्णयाला विरोध करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेसने एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही. ते म्हणजे बांगलादेश’ असे ते म्हणाले.
कॉन्ग्रेसने एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही.
बांगलादेश!!
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) August 7, 2021
दरम्यान, काँग्रेस आणि विरोधक मोटेरा स्टेडियम वरून भाजपला धारेवर धरता आहे. अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

