औरंगाबाद : पतीच्या नात्यातील तरूणाने महिलेवर आत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर सादर केल्यानंतर ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याविषयी आधिक माहिती अशी की, पीडित महिला पतीसोबत वाद झाल्याने मुकुंदवाडी भागात राहण्यास गेली होती. यादरम्यान तिच्या पतीच्या कुटुंबातील तरुणानेही त्याच परिसरात घर घेतले. तो घरी ये-जा करायला लागला. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने अचानक महिलेवर अत्याचार केला. कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडितेने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र, त्याने गैरफायदा घेत काही दिवसांपासून पुन्हा अत्याचार सुरू केला. याप्रकरणी पीडितेने मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. तो विवाहित असून त्याला दोन अपत्येही आहेत. त्याला न्यायालयाने चार दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : MPSCची तारीख उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

