Share

मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव उतरलंय आंदोलनात, ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

Published On: 

जालना : मराठा आरक्षणावर राज्य आणि केंद्र सरकार वेळकाढूपणा करत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात अख्खे गावच आंदोलनात उतरले असून गावकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. पहिले सात दिवस समाजबांधवांनी आंदोलन केले. परंतु, अजूनही यावर निर्णय घेतला जात नसल्यामुळे बुधवारपासून आता गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

गावातील तमाम ग्रामस्थांनी अन्नत्यागाचा आरंभ केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत तीव्र झाला आहे. आरक्षणासाठी आता सरकारला थेट गावातच यावे लागेल, अन्यथा येथेच आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शिक्षणात आरक्षण नसल्याने मराठा समाजातील तरुणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी शिक्षण न घेण्याचाही ठराव घेतला आहे. चांगले गुण असूनही नोकरी मिळत नाही, हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असतानाही फीस भरून शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे साष्टपिंपळगावातील ग्रामस्थ आणखीन आक्रमक होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!