Share

‘काँग्रेस नेते खाली पडल्यामुळे काँग्रेसचे झालेले हसू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले’

Published On: 

मुंबई : दररोज होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वजन सहन न झाल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच बैलगाडीवरून खाली कोसळले. काँग्रेसने गॅस, पेट्रोल आणि डिझेलमध्ये दररोज होणाऱ्या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईत बैलगाडी मोर्च्याचे आयोजन केले होते. मात्र एकाच वेळी अनेक कार्यकर्ते बैलगाडीत चढल्याने एका क्षणात ते रस्त्यावर पडले.

या घटनेनंतर भाजपकडून सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. तर याच मुद्याला धरून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. ‘काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य काँग्रेस नेते खाली पडल्यामुळे झालेले काँग्रेचे हसू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणा देत असताना माणसाचे तर दुरंच राहिले, पण बैलालाही ते सहन झाले नसावे’ असा खरमरीत टोला दरेकर यांनी लगावला आहे.

तसेच ‘इंधन दरवाढी विरोधातील मोर्च्यात एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते व नेते उभे होते. त्यामुळे बैलगाडीचा एक भाग तुटून वेगळा झाला आणि कार्यकर्ते खाली पडले. कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर चढतांना तेथील महिलांचाही विचार केला नाही. त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत आणि अनियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. एका बाजूला राज्य सरकार करोना वाढल्याचे ओरडून ओरडून सांगत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविला व करोनाचे नियमही धाब्यावर बसवले.’ असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच मुद्याला धरून टोला लगावला आहे. आज नागपुरात पत्रकारांशी त्यांनी सवांद साधला यावेळी ते म्हणाले कि, ‘जर तो प्रसंग नीट पहिला तर राहुल गांधीना राष्ट्रीय नेता म्हणल्याचे बैलांना देखील आवडलेले नाही असे दिसत आहे. त्यामुळे ती बंडी तुटली. पण माझ्या कॉंग्रेसच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत.’ असा खरमरीत टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!