मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान आज भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान यावर आता विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच गलिच्छ राजकारण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. ज्या पद्धतीने OBC च्या नेतृत्वाचे पंख छाटण्याचं काम सुरु आहे त्याची परतफेड जनता येणाऱ्या काळात करेलचं. तुम्हाला स्वतंत्र ओळख नव्हती, त्यामागे मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता हे विसरू नका.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच गलिच्छ राजकारण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. ज्या पद्धतीने OBC च्या नेतृत्वाचे पंख छाटण्याचं काम सुरु आहे त्याची परतफेड जनता येणाऱ्या काळात करेलचं. तुम्हाला स्वतंत्र ओळख नव्हती, त्यामागे मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता हे विसरू नका.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 10, 2021
दरम्यान सध्या भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तो एक अपघात होता, मामुंना जनतेच्या समस्या कळणार नाहीत’ ; भाई जगतापांचा फडणवीसांना टोला
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

