मुंबई: भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणे हा योगायोग नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी १२ ऑगस्टच्या पत्राद्वारे मी आपणास मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी पहिली मागणी केली होती. तसेच आयोगावर योग्य संख्येने मराठा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं ही देखील मागणी केली होती. आज ही मागणी करून १५ दिवस झाले तरी आपल्या सरकारकडून याबाबत कुठलेच ठोस पाऊल उचलले गेले नाही. यातूनच सरकारची मराठा समाजाबाबत खरी भावना दिसू येते. असेही ते म्हणाले आहेत.
पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात नेहमी मोठ्या भावाची व समजूतदारपणाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आपण हिरावून घेतलं. यानंतर चुकीचे शासन निर्णय काढून तोंडाला पानं पुसली. आत्ता तर तुम्ही आमच्या आस्तित्वावरंच घाव घालत आहात. मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्याा बातम्या
- पुण्यातील खेळाडूंच्या सेवेत ‘पुण्यदशम’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
