मुंबई:- ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यावरुन आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार भांबावलेलं आहे. त्यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो, अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
तसेच सर्वसामान्य माणसाला नाउमेद करु नका. कोरोनापेक्षा तो उपासमारीने मरेल. छोट्या-मोठ्या व्यावसायीकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. पण दुर्दैवानं ते होताना दिसत नसल्याची खंतही दरेकरांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोनिया गांधींनी लिहलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला : थोरात
- घाबरू नका ! कोरोनाचा नवा प्रकार अनियंत्रित झालेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
- ‘पहिले मंदिर फिर सरकार’असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदललीय’
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- मुंबई : प्रसूतीगृहाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने; भाजप नगरसेवकानी सभात्याग केला


