🕒 1 min read
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत.यातच आता सोनिया गांधी यांनी लिहलेले पत्र सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे.
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले. या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी हा हेतू असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र लिहिले असल्याची चर्च राजकीय वर्तुळात सुरु झाली.
दरम्यान, यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील अनुसुचित जाती जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सोपवले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सोनियाजी यांनी अनुसुचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सुचना रास्त असून सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाज घटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करत असतात तसेच सोनिया गांधी देखील मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररुपी संवाद आहे. दलित व मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती. या बैठकीत काही मुद्दे चर्चेत आले होते त्या संदर्भात सोनियाजी यांनी पत्र लिहून काही सुचना केल्या आहेत असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज : मुख्यमंत्री
- घाबरू नका ! कोरोनाचा नवा प्रकार अनियंत्रित झालेला नाही; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
- ‘पहिले मंदिर फिर सरकार’असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदललीय’
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- मुंबई : प्रसूतीगृहाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने; भाजप नगरसेवकानी सभात्याग केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

