नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
दरम्यान,ब्रिटनसह काही देशांमध्ये कोविड-19 वरील लसीकरणाला एकीकडे आरंभ झाला आहे. मात्र ब्रिटनमधील सध्या कोरोनाविषयक परिस्थितीचं गांभीर्य पाहता तिथून भारतात येणारी सर्व विमान उड्डाणं 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तर भारतातील कोविड-19 ची स्थिती दिवसेंदिवस सुधारत असून जानेवारीपासून देशात लस वितरण सुरू होईल, असा विश्वास सरकारला वाटतो आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यातआजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील.
संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज : मुख्यमंत्री
- जानेवारी महिन्यात कोरोनावरची पहिली लस देण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री
- ‘पहिले मंदिर फिर सरकार’असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदललीय’
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- मुंबई : प्रसूतीगृहाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने; भाजप नगरसेवकानी सभात्याग केला


