मुंबई : काल सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत भांडुप पूर्व डॉ. जुवेकर मार्ग येथील प्रसूतीगृह चालू करण्याऐवजी रिकाम्या इमारतीस सत्ताधाऱ्यांकडून प्रसूतीगृहाच्या नामकरणाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून मांडण्यात आला. याला भारतीय पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. यावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बोलू न देता बहुमताच्या जोरावर नामकरण प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने भाजप नगरसेवकानी सभात्याग केला.
प्रसूतीगृहाचे काम सुरू होण्याआधीच रिकाम्या इमारतीस नामकरणासाठी शिवसेनेने गुडघ्याला बाशिंग बांधल्याचा आरोप यावेळी भाजपा नगरसेवकांनी केला. भांडुप, कांजुर, विक्रोळी विभागातील सर्वसामान्य नागरिकांना प्रसुतीगृहाच्या सुविधा मिळाव्यात या हेतूने भांडुप पूर्व डॉ. जुवेकर मार्ग येथील महापालिकेच्या जागेवर आरक्षण समायोजन तत्वावर प्रसुतीगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत गेली ९ वर्षांपासून प्रसूतिगृह चालू होण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने व स्थानिक नगरसेविका सारिका पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना स्वस्त दरातील आरोग्य सेवा उपलब्ध करून आरोग्य विषयक प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेळोवेळी उदासीनता दाखवली आहे.
प्रसूतिगृहासाठी केवळ तीन मजली इमारत बांधून गेले दोन वर्षे रिकामी पडलेली आहे. या इमारतीत प्रसूतिगृह उभारणीचे कुठली काम अद्याप सुरूही झालेले नाही. प्रसुतीगृह कायमस्वरूपी चालू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सत्ताधाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे भांडुप, कांजूर, विक्रोळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक व आजूबाजूच्या इतर महिला रहिवाशांना उपचारासाठी सात ते आठ किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे गर्भवती महिलांचे हाल होत आहे. म्हणूनच आधी प्रसुतीगृहात पायाभूत आरोग्य सुविधांची उपलब्धता केली जावी. रुग्णालय जेव्हा सुरू होईल त्यावेळेस त्याचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका सारिका पवार यांनी केली. यावेळी नगरसेवक सुनील यादव, प्रकाश मोरे, नगरसेविका बीना दोषी, अनिता पांचाळ, सुनिता मेहता यांनी अध्यक्षांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी सभात्याग केला.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणार; आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- जानेवारी महिन्यात कोरोनावरची पहिली लस देण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री
- संदीप जोशींच्या राजीमान्यानंतर आता ‘हा’ दिग्गज नेता होणार नागपूरचा महापौर
- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे : राष्ट्रवादी
- भाजपाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून काम करत राहू : संदीप जोशी


