मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे या साठी सतत 16वर्षे संघर्ष करणाऱ्या लढवय्या भीमसैनिक योद्द्यांचा जाहीर सत्कार मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नामांतराच्या 27 व्या वर्धापन दिना निमित्त नामांतर लढ्यातील योद्द्यांचा सरकार सोहळा घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहिद स्मारक सभागृहत दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रिपाइं चे महाराष्ट्र् राज्य उपाध्यक्ष डी एम चव्हाण,चिंतामण गांगुर्डे,राजाभाऊ गांगुर्डे,काका गौंगुर्डे,नंदू साठे यांनी दिली आहे.
नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा सत्कार सोहळ्यात पँथर चे संस्थापक दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ प्रा. अरुण कांबळे या दिवंगत मान्यवरांसह रिपाइं चे माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर,काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
- जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे : रामदास आठवले
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
