Share

चाहत्यांची प्रतिक्षा संपली, ‘या’ तारखेला सुरु होणार कौन बनेगा करोडपती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचे महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांना गेल्या दशकभरापेक्षा कौन बनेगा करोडपती या शो द्वारे छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या शोचे १२ भाग प्रसिद्ध झाले आहेत. मात्र अद्यापही या शोची लोकप्रीयता तसुभरही कमी झालेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने सजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’चा तेरावा सिझनची तारीख प्रसिद्ध झाली आहे. येत्या २३ ऑगस्ट पासुन केबीसी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन हे करणार आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसापुर्वी या शोचा प्रोमो सोशल मीडीयावर शेअर केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बच्चन यांनी ‘कमिंग बॅक…. ऑन केबीसी’ असे लिहीले होते.

या कार्यक्रमात सर्वसामान्य ज्ञानाशी निगडीत प्रश्न विचारले जातात. यात सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सिटवर बसलेल्या स्पर्धकाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर स्पर्धक ७ कोटी रुपयांची रक्कम जिंकु शकतो. स्पर्धेच्या मागील भागात चार स्पर्धक करोडपती बनले होते. ‘देवीयो और सज्जनो..’ असा संवाद बीग बीच्या तोंडुन ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!