Share

प्रतिक्षा संपली! ‘सुदर्शन चक्रपाणी’ पुन्हा येतोय, ‘समांतर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशीच्या ‘समांतर’ या वेबसीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकेल, या आशयाला अनुसरून एक थरारक कथा एम एक्स प्लेअरने समांतर या वेबसिरीजच्या रूपात प्रकाशित केली आहे.

एका उत्कंठावर्धक वळणावर हा शो संपल्याने आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर होते. त्यामुळे आता यापुढे काय असणार हे पाहण्यासाठी अनेकजण याची आतुरतेने वाट पाहत होते. ही उत्सुकता अधिक न ताणता ‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या शोच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, ‘समांतर २ ’ चे दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत. पहिल्या सिझनमध्ये स्वप्नील जोशीने साकारलेल्या कुमार महाजनने नितेश भारद्वाज यांचा म्हणजेच म्हणजेच सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. त्यानंतर आता ‘समांतर २’ ची प्रतीक्षा जास्त न ताणता आताया वेब सिरीजचा ट्रेलर २१ जून मराठी एमएक्स ओरिजिनलवर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!