🕒 1 min read
नांदेड : राज्यात आणि जिल्ह्यात अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या आरोपील धर्माबाद पोलिसांनी गुजरात राज्यातून जेरबंद केले आहे. या आरोपीने तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात व तेलंगणा राज्यात अनेक लोकांना कोट्यावधी रुपयांना जेरबंद केले आहे. हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता असे धर्माबाद पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी नरसिंह शकंरोड हा धर्माबाद शहरात एस.बी.आय लाईफ इन्शुरन्स, विश्वासपुर्ण शेती, प्लॉटच्या खरेदी विक्री, भिशी आदी व्यवसाय करुन त्याने स्थानिकांचा विश्वास संपादन केला. लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी नरसिंह याने नांदेड जिल्हा परिषद इमारतीच्या जवळ राधेलाल चिटफंड नावाचे कार्यालय थाटले. या कार्यालयात अनेक जणांनी मोठी गुंतवणूक केली.
काही दिवसातच जमा झालेली रक्कम घेऊन शंकरोड हा पत्नीसह २०१९ मध्ये पसार झाला. याप्रकरणी धर्माबाद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. यानंतर २ वर्षे तपास केल्यानंतर नुतन पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी तपास सुरु केला असता तो गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांनी पोलिसांचे पथक तिथे पाठवून त्याला जेरबंद केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन? जाणून घ्या काय सत्य काय आहे
- पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवेंचा अवघ्या पाच महिन्यांत राजीनामा
- जीर्ण इमारतीमुळे दवाखान्याची ओपीडी रस्स्त्यावर; कधीही कोसळण्याची भिती
- जिल्ह्यातील सर्व शाळा 15 मार्चपर्यंत बंद, इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू
- ‘हा दिनो मोरिया कोण आहे? हा सरकारचा जावई आहे का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
