🕒 1 min read
अमरावती : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात येत असून, काही ठिकाणी म्युकरमायकोसीस आजाराचाही प्रादुर्भाव आढळला आहे. त्यानुषंगाने ईएनटी तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक गठित करण्याचे निर्देशही पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. तिसऱ्या लाटेसदृश स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तो रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढत आहोत. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. या उपचार सुविधांत भर घालताना लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याचबरोबर नव्याने उभ्या राहणाऱ्या अडचणींवर आपण वेळीच मात केली पाहिजे. साथीबाबत जराही गाफील राहून चालणार नाही.
लहान मुलांना तिसऱ्या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये लक्षणे दिसताच त्यांच्या आरटीपीसीआर अहवालाची वाट न पाहताच उपचार सुरू करावेत. लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्ययंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात यावा. म्युकरमायकोसीस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याबाबत बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा धायगुडे यांचे निधन
- ‘अहो नड्डा, मोदींनी देशाला बनवलंय मृत्युंचा अड्डा’, सचिन सावंताचे शायरीतून टोले
- कायदा फुलप्रूफ असता तर आज ही वेळ आली नसती ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
- ‘लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा’
- शाब्बास औरंगाबादकर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात आपण यशस्वी- आयुक्त पांडेय


