चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
पहिल्या सामन्याता झालेल्या पराभवानंतर या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासु नये म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला होता. सामन्यात कोलकाता संघाच्या डावातील रोहित शर्मा स्वत: १४व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. मात्र पहिलाच चेंडू टाकताना रनअपच्या वेळी त्याचा पाय मुरगळला आणि हिटमॅन वेदनेने व्हिवळू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1382024984730558465
काही वेळातच मुंबईच्या संघाची वैद्यकीय टीम मैदानावर आली. त्यांनतर हिटमॅनने आपले षटक पुर्ण केले आणि सामना संपेपर्यंत मैदानावर होता. प्रथम फलंदाजी करताना रोहितने ३२ चेंडुत ३ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मुंबईच्या संघाने सर्वबाद १५३ धावापर्यंत मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतून चाेरी झालेल्या कारमध्ये मनसुख हिरेनची हत्या, एटीएसच्या अधिकाऱ्याचा दावा
- हाताचे तुटलेले बोट असतानाही कमीन्सने रोहित-इशानला धाडले तंबूत
- कोरोना अलर्ट! जालना; ८६४ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू
- जालन्यात अवैध दारूची विक्री; १५ जणांवर कारवाई
- राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे बेन स्टोक्स स्पर्धेतुन बाहेर


