नवी दिल्ली- मागील दोन आठवड्यांपासून बांगलादेशमधील वेगवेगळ्या भागांमधून हिंदूविरोधातील हिंसेच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनाही घडल्यात. रविवारी येथील रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला करुन त्यापैकी २० घरं पेटवून दिली. मागील आठवड्यामध्ये नानूअर दिघी तलावाजवळ नवरात्रीनिमित्त दुर्गेची प्रतिष्ठापना केलेल्या मंडपामध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांचा अमेरिकेनं निषेध केला आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी या बाबत ट्वीट केलं आहे. बांगलादेश सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे. आपल्या धार्मिक भावना किंवा श्रद्धा जपण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असं प्राइस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मुशरफ मुर्तझा याने देखील सध्या मायदेशामध्ये सुरु असणाऱ्या हिंसेचा निषेध केला आहे. हिंदू अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह असल्याचं मुर्तझाने म्हटलं आहे. बंगाली भाषेमध्ये मुर्तझाने आपल्या फेसबुक पेजवर एका फोटोसहीत आपलं मत व्यक्त केलंय. बांगलादेशचा दोनदा पराभाव झालाय. एक टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडने पराभूत केलं तेव्हा आणि एक पराभव घरी (मायदेशी) झालाय, असं मुर्तझा म्हणालाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर
- अनिल देशमुखांच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय, पकडण्यासाठी परत छापेमारीची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

