Share

पालकमंत्री मलिक यांना हटवण्याची प्रहार संघटनेनी मागणी, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

Published On: 

परभणी : येथील पालकमंत्री नवाब मलिक यांनी कोराेनाच्या परिस्थितीमध्ये देखील परभणी जिल्ह्यासाठी वेळ मिळाला नाही, ते केवळ ध्वजारोहणासाठी येतात, यामुळे मलिक यांना पालकमंत्री या पदावरुन हटवण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या जागेवर कार्यक्षम पालकमंत्री पदी नियुक्त करावे, अशी देखील मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये देखील परभणी येथील कोरोना रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तसेच औषधी मिळत नसल्याने रुग्णांना मरण यातना भोगण्याची परिस्थिती आली आहे. अशी गंभीर परिस्थिती झाली असताना पालकमंत्री परभणी येथे आले नाहीत. तसेच बेडची संख्या देखील अपुरी पडत आहे. तसेच लसीकरणाच्या डोस तसेच रेमिडीसिविरचा देखील तुटवडा जाणवत आहे.

मलिक यांनी कोणत्याही प्रकारची मदत तसेच प्रशासनाला कोणतेही आदेश देखील दिले नाहीत. तसेच कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच त्यांना पक्षांच्या विविध जबाबदाऱ्या असल्याने त्यांना परभणी येथे येण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर दुसऱ्या कार्यक्षम असणारे पालकमंत्री यांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या एका निवेदनामधून जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या      

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!