Share

फिक्सिंग प्रकरणात गजाआड गेलेला पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटु होणार अंपायर

Published On: 

मुंबई : गेल्या काही वर्षात पाकिस्तानचा संघ नेहमी या ना त्या कारणाने वादात सापडत असतो. यात काही वर्षापुर्वी फिक्सींग प्रकरणानाने पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली होती. या प्रकरणात सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

इंग्लंडमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बटवर 10 वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तसेच या प्रकरणामुळे काही काळ तो तुरुंगात होता. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सलमान बट मैदानावर पुनरागमन करणार आहे. मात्र खेळाडु म्हणून नव्हे तर अंपायर म्हणून. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकताच एक ऑनलाईन अंपायरिंगं कोर्स आयोजीत करण्यात आला होता. या कोर्समध्ये 346 सदस्य सहभागी झाले होते. यात सलमान बटचाही समावेश होता.

2010 साली ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये लॉर्डस येथे पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान कसोटी सामना सुरु होता. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान बटने संघाचे गोलंदाज मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ या गोलंदाजाना नो बॉल टाकण्यास सांगितले होते. हे प्रकरण समोर आले तेव्हा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. यानंतर या खेळाडूंना निलंबनासहीत काही काळ तुरुंगातही जावे लागले होते. बंदी नंतर मोहम्मद आसिफने पुनरागमन केले आणि काही काळात निवृत्ती देखील स्विकारली मात्र इतर दोन खेळाडू पुनरागमन करण्यात अयशस्वी ठरले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!